Home धर्म-समाज सीबीआयचे माजी अध्यक्ष रंजीत सिन्हा यांचं निधन

सीबीआयचे माजी अध्यक्ष रंजीत सिन्हा यांचं निधन

0
28

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सीबीआयचे माजी अध्यक्ष रंजीत सिन्हा यांचं निधन झालंय. आज त्यांनी पहाटे ४.३० वाजल्याच्या सुमारास दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ६८ वर्षांचे होते.

रंजीत सिन्हा १९७४ च्या बॅचचे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी होते. त्यांनी सीबीआय तसंच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसचे महासंचालक म्हणूनही जबाबदारी हाताळली होती. २२ नोव्हेंबर २०१२ रोजी पुढच्या दोन वर्षांसाठी त्यांना सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाचं नेतृत्वही केलं होतं तसंच पाटणा, दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदांची जबाबदारीही हाताळली होती.


Protected Content

Play sound