यावल तालुक्यात १४ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळणार दोन हजार रुपये अनुदान

 

यावल, प्रतिनिधी । राज्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या वेगाने वाढत्या प्रादुर्भावचा टाळण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत गरीब नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली असून यात यावल तालुक्यातील १४ हजारांपेक्षा जास्त विधवा, निराधार व अपंग नागरिकांना प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी  दि. १५ ते ३० एप्रीलपर्यंत नागरीकांनी आपल्या घरातच रहावे सुरक्षीत रहावे या दृष्टीकोणातुन संचारबंदी लावण्यात आली आहे.  दरम्यान, या पंधरादिवसाच्या कालावधीत अपंग , निराधार नागरीकांना आपली उपजिवीका भागविण्यासाठी आर्थिक  अडचणींना सामोरे जावु नये या करीता राज्यातील महा विकास आघाडी शासनाने तालुक्यातील संजय निराधार योजनेचे ३९०४लाभार्थी , वृद्धपकाळ योजनेचे ५ हजार२८५ लाभार्थी , श्रावणबाळ वृद्धपकाळ योजनेचे ४ हजार३३७लाभार्थी , इंदीरा गांधी निराधार योजनेचे १३६६ लाभार्थी व इंदीरा गांधी अपंग योजनेचे ७१लाभार्थी असे एकुण १४ हजार९०६ लाभार्थ्यांना सुमारे दोन कोटी ५० लाख रुपये हे येत्या आठ दिवसाच्या आत प्रत्यकाच्या बॅंकेतील खात्यात दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असुन , शासनाच्या वतीने या संकटकाळातील मिळणाऱ्या मदतीचे निराधार व अपंग, विधवा महिला व नागरीकांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे . अशी माहीती नायब तहसीलदार आर .डी . पाटील व संजय गांधी निराधार योजना विभाग कार्यालयाचे प्रफ्फुल कांबळे यांनी दिली आहे .

 

Protected Content