Home Cities जळगाव पोलीसात तक्रार दिल्याचा रागातून ईच्छादेवी चौकात तरूणाला मारहाण

पोलीसात तक्रार दिल्याचा रागातून ईच्छादेवी चौकात तरूणाला मारहाण


जळगाव प्रतिनिधी । घरासमोर असलेली आसारी चोरी केल्याचा संशय व्यक्त करत पोलीसात तक्रार दिल्याचा राग आल्याने दोघांनी तरूणाला दगडाने डोक्याला मारहाण करून जखमी केल्याची घटना इच्छादेवी चौकात १० एप्रिल रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, ईश्वर सीताराम पाटील (वय-४०) रा. इच्छादेवी मंदीराच्या पाठीमागे, तांबापूर हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी घराचे किरकोळ बांधकाम करण्यासाठी त्यांच्या अंगणासमोर आसारी ठेवली आहे. दरम्यान १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या अंगणात ठेवलेली असारी चोरल्याचा संशय गल्लीत राहणारे गणेश गोविंद मिस्तरी आणि ललित मिस्तरी दोघे रा. इच्छादेवी मंदीराच्या पाठीमागे यांच्यावर केला. याप्रकरणी पोलीसात तक्रारही ईश्वर पाटील यांनी केली होती. याचा राग आल्याने संशयित आरोपी गणेश आणि ललित यांनी इच्छादेवी चौकासमोर दोघांना ईश्वर पाटील यांच्या डोक्यात दगड टाकून दुखापत केली. इश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे. 

 


Protected Content

Play sound