यावल प्रतिनिधी । जिल्हा परिषद जळगावच्या वतीने देण्यात येणाऱ्या शेष अंतर्गत पुरस्काराची यावल पंचायत समिती स्तरावर सन 2019/ 20, 2020 -21 या वर्षाचे पुरस्कार तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना जाहीर करण्यात येवुन आज यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे.
आज दिनांक ८ एप्रील रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सन 2019/ 20 या वर्षाचा आदर्श शेतकरी पुरस्कार डांभुर्णी येथील दिलीप उखा चौधरी यांना तर 2020/ 21 व्या वर्षाचा अनिल रघुनाथ जोशी राहणार साकळी यांना सपत्नीक यावल पंचायत समिती सभागृहात सभापती सौ पल्लवी चौधरी उपसभापती योगेश भंगाळे, पंचायत समितीचे गटनेता दीपक अण्णा पाटील पंचायत समिती गटविकास अधिकारी निलेश पाटील, डांभुर्णीचे उपसरपंच पुरूजीत चौधरी यांच्या उपस्थित देण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये प्रति धनादेश सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चांगले काम करणारे अधिकारीवर्ग सुद्धा प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
याप्रसंगी डॉ. निलेश पाटील गटविकास अधिकारी यांनी शेती हा अविभाज्य घटक आहे शेती मध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरावी यासाठी अधिकारी वर्ग शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करते. यातूनच शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होते या शेतकऱ्यांनी ते ऐकून पुरस्कार प्राप्ती साठी आपली मजल गाठली त्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करावे. आपणाला ही कसा पुरस्कार कसा मिळेल यासाठी चढाओढी मध्ये शिकस्त घालावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज हिवराळे विस्तार अधिकारी कृषि यांनी केले तर आभार यावल पंचायत समिती कृषी अधिकारी दिनेश कोते यांनी मानले .