मुक्ताईनगरात ऑक्सिजन, बेडचा तुटवडा : १५ मिनिटात १० लाखांचा निधी उपलब्ध

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे वाढती रुग्ण संख्या पाहता मुक्ताईनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्रणाली तसेच बेड कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदारांसह व्यापारी असोसिएशन, वैद्यकीय आघाडी, मेडिकल असोसिएशन तसेच इतर वैयक्तिक व्यापाऱ्यांनी अवघ्या १५ मिनिटात १० लाखाचा निधी उपलब्ध केला आहे. हा जिल्ह्यातील एकमेव आदर्श असून होळी व रंगपंचमीच्या मुहूर्तावर यशस्वी झाल्याने रुग्ण सेवेची अनोखी होळी व रंगपंचमी मुक्ताईनगर येथे साजरी झाल्याचे दिसून आले.

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेड असलेले अत्याधुनिक स्री व पुरुष दोन कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे ही ऑक्सिजन प्रणालीचे काम प्रगतीपथावर आहे.  त्यातच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात  वाढत असल्याने येथे बेड व ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत होती. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांच्याशी चर्चा केली असता ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाल्यास एकाच वेळी अधिक रुग्णांना सेवा देता येईल असा मुद्दा समोर आला. त्यानुसार आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरातील स्वयंसेवी समाजसेवक, मेडिकल असोसिएशन , व्यापारी असोसिएशन, इतर व्यापारी यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित केली.

सदर बैठकीत तहसीलदार श्वेता संचेती, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन (बंटी) जैन, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील , रमेश कडू पाटील, डॉ. विक्रांत जयस्वाल, डॉ. दिलीप तायडे,  कॉटन किंग कोमलसिंग राजपूत , ललित रेडिमेडचे विपुल जैन, ओम रेडिमेड चे कैलास शिर्के ,मेडिकल असोसिएशनचे सचिन जैन, सुनील उदे, निवासी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, अमोल पाटील ,कल्याण पाटील, मुकेश महल्ले हे प्रमुख उपस्थित होते.

अवघ्या 15 मिनिटात 10 लक्ष निधी जमा 

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे दोन लाख रुपये, रमेश कडून पाटील यांच्यातर्फे दोन लाख, सुनील ऊदे यांचेकडून 2 लाख रु ,व्यापारी असोसिएशन तर्फे एक लाख, मेडिकल असोसिएशन तर्फे एक लाख , अमोल पाटील व कल्याण पाटील यांच्यातर्फे दोन लाख अशा एकूण दहा लाख रुपयांचा निधी केवळ पंधरा मिनिटात गोळा करण्यात आला.मुक्ताईनगर हा जिल्ह्यातील एकमेव प्रयोग होळी व रंगपंचमीच्या मुहूर्तावर यशस्वी झाल्याने रुग्ण सेवेची अनोखी होळी  मुक्ताईनगर येथे साजरी झाल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांनी सर्वांचे आभार मानले . प्रसंगी स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी,सुनील पाटील, शुभम शर्मा, वसंत भलभले, दिलीप चोपडे, निलेश घुले, गुलाब शेख आदींची  उपस्थिती होती.

ड्युरा सिलेंडर हा जिल्ह्यातील ठरणार पहिला यशस्वी प्रयोग 

मुक्ताईनगर येथे उपजिल्हा रुग्णालयात कोरोना अतिक्षती ग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणेसाठी दर 15 मिनिटाला एक सिलेंडर लागत होते.यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा सिव्हिल सर्जन व जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांना सूचना केल्यानुसार गेल्या आठवड्या पर्यंत सिलेंडर मुबलक उपलब्ध होत होते.परंतु आता संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस आढळून येणारी रुग्ण संख्या पहाता ऑक्सिजन बेड कमतरता सगळीकडेच जाणवू लागली आहे.यामुळे वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्ण उपचारा अभावी मृत्यू मुखी पडत असल्याचे भयावह स्थिती संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. अशा वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे यांनी ड्युरा सिलेंडर प्रणाली बद्दल सांगितले त्यानुसार वरील बैठक आमदारांनी तातडीने आयोजि करून 10 लक्ष रु चा निधी उभारून तहसीलदार श्वेता संचेती व डॉ योगेश राणे यांच्या हातात निधी सोपविला.

काय आहे ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन प्रणाली : – 

आता आपण थोडं ड्युरा सिलेंडर बद्दल जाणून घेऊया , दर 15 मिनिटाला एक सिलेंडर 45 रुग्णासाठी लागत होते. त्यातच आमदारांच्या सुचनेनुसार 20 रुग्णांना वाढीव ऑक्सिजन प्रणाली सुरू होत असल्याने येथे एकूण 65 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा प्रणाली सुरू झाल्यास दर 10 मिनिटाला 15 kg क्षमतेचे एक ऑक्सिजन सिलेंडर लागणार यामुळे ऑक्सिजन सिलेंडर अपूर्ण पडणार होते. व सिलेंडर पुरवठा वेळेवर झाला नसता , त्यामुळे येथे ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन प्रणाली निर्माण करणे आवश्यक होते .कारण यात एका वेळेस 15 kg क्षमतेचे तब्बल 30 ऑक्सिजन सिलेंडर बसतात.  यासाठी येथे  दोन ड्युरा सिलेंडर  ची आवश्यकता होती. ज्यामुळे तब्बल  विना खंड पडता सलग 7 तास ऑक्सिजन पुरवठा करता येऊ शकतो. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अशा केवळ दोन ड्युरा सिलेंडर ची आवश्यकता येथे तातडीने करणे गरजेचे होती. झालेल्या बैठकीत सुमारे 10 लक्ष रु निधी स्वयं स्फूर्तीने जमा झाल्याने आता मुक्ताईनगर येथे दोन नव्हे तर तब्बल 5 ड्युरा सिलेंडर ची उपलब्धता होणार आहे.

 

Protected Content