Home Cities जळगाव शेंदुर्णी येथे कै.काशीनाथराव गरुड यांच्या तैलचित्राचे अनावरण

शेंदुर्णी येथे कै.काशीनाथराव गरुड यांच्या तैलचित्राचे अनावरण

0
34

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील दक्षिण भाग वि.का.सह. सोसायटीचे कार्यालयात आज कै. काशीनाथराव गरुड यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

यावेळी कै.आबासाहेब गरुड यांच्या प्रतिमेचे अनावरण एज्युकेशन संस्था सचिव सतीश काशीद यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक अंतर पाळून कार्यक्रम घेण्यात आला दक्षिणभाग सोसायटीच्या इमारतीस या आधीच कै. आबासाहेब काशीनाथराव गरुड यांचे नाव देण्यात आले आहे.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते संजय गरुड, शेंदूर्णी एज्युकेशन संस्था सचिव सतीश काशीद, संचालिका उज्वला काशीद, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, सावजी चांभार, दक्षिणभाग सोसायटीचे चेअरमन सुनील गरुड, व्हाईस चेअरमन प्रवीण सूर्यवंशी, संचालक विजय चौधरी, धनराज नाथ, तज्ञ संचालक रमेश राजपूत, माजी चेअरमन विजय काबरा, लक्ष्मण बारी, सेक्रेटरी संजय चौधरी उपस्थित होते. 


Protected Content

Play sound