Home Cities जळगाव सूरज झंवरच्या रिटपिटिशनसह जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

सूरज झंवरच्या रिटपिटिशनसह जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

0
102


जळगाव प्रतिनिधी । बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील संशयित सूरज झंवर याच्या रिट पिटीशनसह जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील संशयित सूरज सुनील झंवर याने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशनसह जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. यात सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद करतांना सूरज याच्याविरुध्द अनेक पुरावे आहेत. त्याचा गुन्ह्यात सहभाग आहे. सूरज व त्याचे वडिल सुनील झंवर या दोघांचे कार्यालय एकच होते. नावालाच त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या, फर्म स्थापन केलेल्या असल्याचे सांगितले. यामुळे न्यायालयाने त्याची रिट पिटीशन फेटाळून लावत जामीन अर्ज देखील नाकारला.

न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर हे कामकाज झाले. सूरजचे वडिल सुनील झंवर याला अटकेपासून १७ मार्चपर्यंत दिलासा मिळालेला आहे.


Protected Content

Play sound