जळगाव प्रतिनिधी । एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, जळगाव अंतर्गत पत्रकार भवन, जळगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त आज कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.), सहाय्यक जिल्हाधिकारी तथा बेटी बचाव बेटी पढाव कृती समितीच्या अध्यक्ष यांनी भुषविले.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी महिलांनी मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी, पी.सी.पी.एन.डी.टी. (PCPNDT) कायदा, महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, बेटी बचाव बेटी पढाव आदि विषयावर मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांना झाशीची राणी महिला बचतगट, जळगाव यांनी सॅनेटरी नॅपकिनचे वाटप केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन आर.आर. तडवी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प.जळगाव, विजयसिंह परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव, श्रीमती प्रीती लुटे, नायब तहसीलदार, जळगाव उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन सौ. रुदाणी देवरे, ॲड. अनुराधा वाणी, आरती साळुंखे, विनोद ढगे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन श्रीमती. सुधा आर. गिर्धेवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव (ग्रामीण) यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती. ए.आर.मुगल यांनी केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका रविंद्रा पाटील, महेंद्र बेलदार, सागर इंगळे, सचिन धनगर यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.