Home धर्म-समाज पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते महिलांचा सत्कार

पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते महिलांचा सत्कार

0
47

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिलांचा सत्कार करणायत आला.  

अध्यक्ष किसनराव नजन पाटील यांच्याकडून पोलीस खात्यातील महिलांचा सत्कार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री. पाटील यांनी समाजातील महत्वाच्या घटकांमध्ये महिलांचा समावेश होत असल्याचे गौरोद्गर काढले.  तसेच महिला पोलीस कर्मचारी यांनी तालुक्यातील महिला पोलीस पाटील यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला. या कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे, महिला पोलीस हवालदार शारदा भावसार, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती बोरसे, वैशाली मराठे तसेच पत्रकार बांधव व महिला पोलीस पाटील व महिला दक्षता समिती सदस्या मिनाक्षी दिवटे, प्रा. वैशाली बोरकर, प्रा. सुनीता मांडोले, वर्षा ब्राह्मणे, संगीता नेवे तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉन्स्टेबल प्रकाश पाटील यांनी केले. 


Protected Content

Play sound