मुंबई : वृत्तसंस्था । रत्नागिरी: नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. लोकशाहीत राज ठाकरे यांना तसा अधिकार आहे. मात्र, शिवसेना नाणार प्रकल्पाविषयीच्या आपल्या पूर्वीच्या भूमिकेवरच ठाम आहे, असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले
ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. दुसऱ्या पक्षांनी पत्र लिहलं तरी शिवसेनेची भूमिका निश्चित आहे. लोकांच्या विरोधामुळेच शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मनसेने आता त्यांची भूमिका मांडली आहे. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आ