यावल, प्रतिनिधी । देशातील केरळ आणि दिल्लीसह इतरत्र होत असलेल्या हिन्दुंच्या हत्या रोखण्यासाठी व दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी केन्द्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडुन सखोल तपास करण्यात येवुन देशातील इतर राज्यातील हिन्दुत्ववादी नेत्यांना सुरक्षा पुराविण्याचे तात्काळ आदेश केन्द्र शासनाने द्यावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे हिन्दु जनजागृती समितीच्या वतीने देशाचे केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात हिन्दु जनजागृती समितीव्दारे आज यावल येथील नायब तहसीलदार आर. डी .पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात मागील काही वर्षात विविध हिन्दुत्वादी नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे, त्यांना जाणीवपुर्वक लक्ष करणे तथा त्यांना वेचुन लक्ष करणे व ठार मारणे अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतीच केरळ आणि दिल्लीमध्ये हिन्दुंच्या हत्या झाल्या आहेत. दिल्लीत रामजन्मभुमी मंदीरासाठी निधी संकलान करणारे रिंकु शर्मा यांची हत्या चाकुमारून एका मुसलमान युवकाकडुन करण्यात आली होती. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहुल कृष्णा उर्फ नंदु यांची पापुलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या एका कार्यकर्त्यांकडुन हत्या करण्यात आली. अशाच प्रकारे हिन्दु नेत्यांच्या हत्याचे प्रमाण केरळ, तामिळनाडू , पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कर्नाटक राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरद मढीवाला ,रूद्रेश कुढुप्पा, प्रविण पुजारी आणी राजु यांच्या हत्या झाल्या आहे . देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या हिन्दुत्वादी नेत्यांच्या हत्यांचे तपास लावण्यात राज्यातील शासन हे अपयशी ठरत असल्याने देशाचे केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे तपास केन्द्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावे. देशातील या मॉडस ऑपरेंडीचा अभ्यास करून या सर्व षडयंत्राचा पर्दाफास करावा , तसेच आवश्कतानुसार केन्द्रीय चौकशी समिती गठीत करावी अशी मागणी केली आहे . या निवेदनावर धिरज भोळे , चेतन भोईटे , विजय तायडे , अरूण सावकारे , राज र्शिके, अविनाश बारी , अजय नेवे, दुर्गेश कोळी , शुभम नारेकर यांच्या स्वाक्षरी आहेत .