एरंडोल न्यायालयातर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल येथील तालुका विधी सेवा समिती आणि एरंडोल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने  ११ एप्रिल रोजी एरंडोल न्यायालय येथे ” जागतिक आरोग्य दिन’ साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात  “Legal Services to the Victims of Drug Abuse and Eradication of Drug Menace Scheme 2015”  या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

त्याअनुषंगाने दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी एरंडोल न्यायालय येथे अॅड.आकाश महाजन आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा बी.ए. तळेकर अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती एरंडोल यांनी सदर विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.अजिंक्य काळे यांनी केले तर आभारप्रदर्शन अॅड. जयेश पिलोरे एरंडोल यांनी केले.  सदर कार्यक्रमास बी. ए. तळेकर दिवाणी न्यायाधीश एरंडोल,विशाल श्रावण धोंडगे दिवाणी न्यायाधीश एरंडाेल,  सहा. सरकारी अभियोक्ता डी.बी.वळवी, सहा. सरकारी अभियोक्ता चेतना कलाल, अॅड. एस.आर.खैरनार, अॅड. आर.एम.दाभाडे, अॅड. ए.एम.काळे, अॅड. आकाश महाजन, अॅड. पी.एस.बिर्ला व इतर विधीज्ञ,  न्यायालयीन कर्मचारी व पो.काॅ. धर्मेंद ठाकूर  तसेच  मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थिती होते.

Protected Content