सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील मस्कावद येथील तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत वृत्त असे की, मस्कावद सीम येथील नारायण जगन्नाथ सरोदे (वय २०) याने मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या वरील मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने हे पाऊल नेमके का उचलले याची माहिती समोर आली नाही. याबाबत पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.