लोकअदालतीत नागरिकांनी सहभागी व्हावे : दिपाली कोतवाल

 

रावेर, प्रतीनिधी । तालुक्यातील ६७ ग्राम पंचायत मधील ४ हजार ७६८ लोकांना ४ कोटी ६९ लाख ९५ हजार ८८० रुपये थकविल्या प्रकरणी नोटीसा देण्यात आले आहे. येत्या १० एप्रिल रोजी रावेरला लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून या लोकअदालतमध्ये सहभाग घेऊन जास्तीत-जास्त नागरीकांनी थकीत ग्रामपंचायतचा कर भरणा करण्याचे अवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.

येत्या १० एप्रिल रोजी आयोजित लोकअदालत संदर्भात आज रावेर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या उपस्थित महत्वाची व्हिडीओ कॉम्फरस द्वारे बैठक संपन्न झाली. यामध्ये रावेर तालुक्यातील ६७ ग्राम पंचायत मधील ४ हजार ७६८ लोकांना विविध ग्राम पंचायत कर घरपट्टी पाणीपट्टी, गाळे कर सह इतर ४ कोटी ६९ लाख ९५ हजार ८८० रुपयांचा कर थकविल्या प्रकरणी नोटीसा देण्यात आले असून येत्या लोकअदालतमध्ये सहभाग घेऊन जास्तीत-जास्त नागरीकांनी थकीत ग्रामपंचायतचा कर भरणा करण्याचे अवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी रावेर तालुक्यातील थकीत करदात्यांना केले आहे. 

 

Protected Content