डॉ.उल्हास पाटील कृषि, कृषि अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा उपक्रम उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील डॉ. उल्हास पाटील कृषि, कृषि अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय  येथे १५ ऑगस्ट रोजी ७५ वा स्वतांत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयात रांगोळी, घोषणा फ़लक तसेच वेगवेगळ्या रंगाचे फुगे फुगवून सजावट करण्यात आली होती. कृषि परिसर संचालक डॉ. एस. एम. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनतर प्रा. कुलदीप अडे यांच्या चार वर्षीय चिमुकल्या चिन्मयने ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त खुप छान असे भाषण दिले. भाषणानंतर कृषि विभागाचे शिक्षण व संशोधन संचालक डॉ. ए. पी. चौधरी तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे व अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष राठी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देताना असे म्हटले की, आजचा हा १५ ऑगस्ट सर्वांसाठी खास असणार आहे, कारण घरोघरी तिरंगा लावत अमृत महोत्सव साजरा होत आहे. १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताची मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.या खास दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. आपल्या प्रियजनांना याबद्दल आठवण करून देणे सहाजिकच आहे. तर आपणही ७५ वा स्वातंत्र्योत्सव साजरा करूया आणि सर्वांना शुभेच्छा देऊया असे ही त्यांनी आवाहन केले.  त्यानंतर महाविद्यालयातील परिसरात घोषणा देऊन मिरवणुक काढण्यात आली. त्यात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

Protected Content