गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १५ ऑगस्ट रोजी ७५ वा स्वातंत्र्यदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गोदावरी अभियांत्रिकीत प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विजयकुमार वानखेडे ( माजी सार्जंट) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थीत होते. स्वातंत्र्यदिनी त्यांचा सत्कार  प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केला. डॉ विजयकुमार वानखेडे यांनी  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची माहिती दिली. तसेच त्यांनी इंडीयन एअर फोर्समध्ये बजावलेली सेवा व इथपर्यंतचा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने कथन केला. तसेच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत हि आपल्यासाठी अभिमानास्पद व गौरवाची बाब आहे, असे नमूद्र केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे नियोजन व मार्गदर्शन प्रा. अनिल विश्वकर्मा यांनी केले त्यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग यांनी सहकार्य केले. १५ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयामार्फत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील विधी कॉलेज, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूट, हरिभाऊ जावळे हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल व इतर संस्थांचे प्राध्यापक वर्ग व मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी क्रीडा संचालक डॉ. आसिफ खान  यांचे सहकार्य लाभले.

गोदावरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार 

स्वातंत्र्य दिनी गोदावरी इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कार अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. पावसाच्या सरी सुरु असतांनाही विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार सुरु होता. विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महाविद्यालयामार्फत ८ ते १२ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. यात ’सेल्फी विथ तिरंगा’, रांगोळी स्पर्धा ,पोस्टर प्रेझेंटेशन हे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद नोंदविला. तसेच हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर तिरंगा फडकविला.

त्याचप्रमाणे महाविदयालयामध्ये माजी सैनिक सत्कार सोहळा दि. १० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये रविंद्र त्र्यंबक भारंबे (हवालदार, वायर लेस ऑपरेटर, १०७ -.ऊ. रेजिमेंट) यांचा सत्कार करण्यात आला.

Protected Content