माहेश्‍वरी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा माहेश्‍वरी विवाह सहयोग समिती, जिल्हा माहेश्‍वरी सभा व श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे (पाळधी) वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

वसंत पंचमीचे औचित्य साधून गुरुवारी मणियार ग्राउंड व महेश प्रगती मंगल कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजातर्फे नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य, नवीन कपडे भेट स्वरुपात आहेर म्हणून देण्यात आले.

माहेश्‍वरी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी, प्रदेश संघटनमंत्री प्रा. संजय दहाड, प्रदेश उपाध्यक्ष मनीष झंवर यांनी नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. सचिव सूरजमल सोमाणी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बंग, राष्ट्रीय संयुक्तमंत्री सुरेंद्र मानधना, प्रदेश सहमंत्री अ‍ॅड. राजेंद्र माहेश्‍वरी, प्रदेश संयुक्तमंत्री विठ्ठलदास आसावा, रामविलास बुब, मनीष मणियार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. तर, या सोहळ्यासाठी बाळकृष्ण बेहेडे, श्यामसुंदर झंवर, सूरजमल सोमाणी, सुभाष जाखेटे, प्रमोद झंवर, विवेकानंद सोनी, डॉ. जगदीश लढ्ढा, वासुदेव बेहेडे, दीपक लढ्ढा, जगदीश जाखेटे, अ‍ॅड. नारायण लाठी, माणकचंद झंवर, शरद कासट, सुनील झंवर, नितीन लढ्ढा, संजय बिर्ला, गिरीश झंवर, तेजस देपुरा, विनोद मुंदडा, प्रदीप मणियार, सुनील कासट, नारायण सोमाणी, हर्षल जाखेटे, कैलास लाठी, नितीन देपुरा, शिवनारायण तोष्णीवाल, नरेंद्र काबरा, बी. जे. लाठी, रमण लाहोटी, राधेश्याम बजाज, तुषार तोतला, अमित बेहेडे, अभिजित झंवर, अ‍ॅड. राहुल झंवर, कैलास मुंदडा, अशोक लढ्ढा, निखिल झंवर, पंकज कासट, अजय दहाड, लोकेश राठी, अभय बियाणी, दीपक कासट, गोविंदा लाठी, चेतन दहाड, राजेंद्र बिर्ला, नंदकिशोर लाठी, राधेश्याम सोमाणी, दिलीप सोमाणी, संजय चितलांगे, विजय मुंदडा, प्रशांत बियाणी, योगेश कलंत्री, विलास काबरा यांच्यासह माहेश्‍वरी संघटनांनी सहकार्य केले.

Protected Content