बोरींग करण्यासाठी आणलेल्या सामानांची चोरी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बोराळे शिवारातील शेतात विहिरीचे बोरिंग करण्यासाठी आणलेल्या सामानांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात बुधवारी ६ एप्रिल रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धनराज भागवत तायडे (वय-३५) रा. अट्रावल ता. यावल यांचे बोरिंग करण्याचे काम करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी यावल तालुक्यातील बोराळे शिवारातील शेत गट नंबर १३० मधील शेतकरी बलराजसिंग गजराजसिंग राजपूत यांच्या शेतातील विहिरीचे बोरींग करण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी शेतात बोरिंग करण्यासाठी साहित्य आणून ठेवले होते. १ एप्रिल रोजी रात्री १० ते २  एप्रिल सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातील बोरिंगसाठी लागणारी पाण्याची मोटार, केबल वायर, लोखंडी पाईप, लोखंडी चैन असा एकूण २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याबाबत धनराज तायडे यांनी यावल पोलिस ठाण्यात बुधवारी ६ एप्रिल रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुले करीत आहे.

Protected Content