शेंदूर्णी प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या गोंदेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी देवानंद शिंदे यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, देवानंद शिंदे यांच्या घरात वडील सुभाष शिंदे, व काकूंनी सरपंच पद भूषविले आहे. देवानंद शिंदेंनी यांनी या आधी कोणतीही निवडणूक लढलेली नसतांना प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक लढवली व सरपंच पदही मिळवले. सरपंचपदी निवड झालेले देवानंद सुभाष शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांचे खंदे समर्थक असून त्यांच्या निवडीमुळे जामनेर तालुक्यातील सर्वात तरुण सरपंच होण्याचा मानही देवानंद शिंदे यांना मिळाला आहे. तसेच परिसरातील व तालुक्यातील युवकांच्या आशा उंचावल्या असून बऱ्याच तरुणांमध्ये आता राजकारणाचे आकर्षक वाढू लागले आहे. गोंदेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ व भाजपचे ३, मनसे १ असे नऊ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचेच दिलीप तडवी हे उपसरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणार असल्याचे नूतन सरपंच देवानंद शिंदे, उपसरपंच दिलीप तडवी यांनी सांगितले आहे.