Home धर्म-समाज मयुर वाघ “शेतीरत्न – २०२१” पुरस्काराने सन्मानित

मयुर वाघ “शेतीरत्न – २०२१” पुरस्काराने सन्मानित

0
52


पाचोरा प्रतिनिधी । गुणिजन गौरव पुरस्कार संमेलन- २०२१ सोहळा नुकताच नाशिक येथे संपन्न झाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या कडुन देण्यात येणारा यंदाच्या “शेतीरत्न – २०२१” पुरस्काराचे मानकरी बांबरूड (राणीचे) ता. पाचोरा येथील युवा आदर्श शेतकरी व प्रयोगशील शेतकरी मयुर वाघ हे ठरले आहेत. 

मयुर वाघ यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट नाशिकचे अध्यक्ष स्वामी श्रीकण्ठानन्द महाराज, मुंबई येथील सुप्रसिध्द साहित्यिक रमेश आव्हाड यांचे सह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मयुर वाघ यांना मिळालेल्या शेतीरत्न पुरस्काराने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

 


Protected Content

Play sound