Home क्रीडा राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा प्रथम!

राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा प्रथम!

0
36

 

जळगाव, प्रतिनिधी । राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रे हिने १४ वर्षआतील वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला. तिच्या या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सायकलिंग असोसिएशन औरंगाबाद जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय रोड सायकलिंग स्पर्धा नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडल्या. स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव येथील खेळाडू आकांक्षा म्हेत्रे हिने १४ वर्षाआतील वयोगटात ७ किमीचे अंतर १२ मिनिट १ सेंकदात पार करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आकांक्षा हीने या आधी देखील अनेक सायकलिंग आणि जलतरण स्पर्धा गाजवल्या आहेत. आकांक्षाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound