यावल प्रतिनीधी । तालुक्यातील नावरे येथील रहीवाशी व साकळी प्राथमिक आरोग्य केद्रातील आशा गटप्रवर्तक लीना पाटील व अंगणवाडी सेविका शोभा पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील धनगर यांचा वाड्यावर जाऊन लहान बालकांना पोलिओ डोस दिला.
३१ जानेवारी रोजी तालुक्यात विविध ठिकाणी पल्स पोलिओ मोहिम अंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना “दो बुंद जिंदगी के” लस पाजण्यात आली. जंगलात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या (धनगर) ठेलारी यांची मुल पोलिओ लस पासुन वंचित राहु नये म्हणून साकळी प्राथमिक आरोग्य केद्रातील आशा गटप्रवर्तक लीना पाटील व अंगणवाडी सेविका शोभा पाटील यांनी दोन कीलो मीटर लांब पायपीट करुन शेतमजुरीस आलेल्या महिलांच्या बालकांना पोलिओ डोस दिला. या राष्ट्रीय कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी साकळी प्राथमिक आरोग्य केद्रातील डॉ. सागर पाटील, डॉ. स्वाती कवडीवाले यांचा मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, आशा सेविका यांनी व त्यांच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.