पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील प्रतिष्ठित समजली जाणारी ग्रामपंचायत गाळण बुच्या सरपंचपदी अनुसूचित जाती प्रवर्ग मधून निवडणूक लढवून आलेले सदस्य राजेंद्र सावंत यांची सरपंचपदी निवड निश्चित समजण्यात येत आहे. गाळण बुच्या इतिहासात ६० वर्षात एक मागासवर्गीय तरुणास संधी मिळणार असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेंद्र सावंत हे राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, पत्रकारिता यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे दिगग्ज नेते अनिल सावंत सर यांचे काका असून त्यांच्या संपूर्ण श्रेयात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असून गावातील सत्तांतरामध्ये सुद्धा ते आणि त्यांचे भाऊ सुनील सावंत सर हे किंगमेकर ठरले आहेत. त्यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. पण शेवटपर्यंत परिवर्तन पॅनलच्या सोबतच राहून सरपंच राजेंद्र सावंत तसेच अनिल सावंत सर, सुनील सावंत सर काम करणार आहेत. राजेंद्र सावंत गाळण सरपंचपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सत्कार श्री राजेंद्र सावंत यांनी प्रतिष्ठित ग्रामपंचायत गाळण बु च्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महाराष्ट्र प्रदेश उप अध्यक्ष पांडुरंग आण्णा, कर्मचारी आघाडी जिल्हा अध्यक्ष बी. बी. मोरे, जिल्हा संघटक अनिल सावंत, तालुका अध्यक्ष पाचोरा राजेंद्र सोनवणे, तालुका सचिव उमेश सोनवणे , युवा तालुका अध्यक्ष सुपडू सावंत सर्व पदाधिकारी राष्ट्रीय चर्मकार महा संघ पाचोरा तालुका व शहर विशेष म्हणजे राजेंद्र सावंत हे राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुक्यातील युवा आघाडीचे प्रमुख सल्लागार आहेत.