उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका भोवली : शाम देशपांडे यांची पक्षातून गच्छंती

पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून माजी पुणे शहरप्रमुख शाम देशपांडे यांच्यावर शिवेसेना मध्यवर्ती कार्यालयाने पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली आहे.

 

शाम देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने नाराजी व्यक्त करणरे जाहीर पत्र १६ मे रोजी लिहले होते. पत्रात त्यांनी आजपासून आपण शिवसेनेचे काम थांबत असल्याचेही म्हटले होते. दरम्यान, पक्षाने त्यांच्या पत्राची दखल घेऊन त्यांची पक्षातून गच्छंती केली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून शाम देशपांडे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असल्याने जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान शाम देशपांडे यांनी लिहिलेलं पत्रात म्हटले आहे की, शिवसेना-भाजपा युती तुटल्याने अनेक शिवसैनिकांना दु:ख होत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका केल्याने क्लेश होत आहे. भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला आहे अशीच माझी भावना आहे. संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वादात ओढून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळे आजपासून मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत असल्याचे शाम देशपांडे यांनी पत्रकात म्हटले होते.

Protected Content