जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची माणसे, मुले आणि नातवंडे सांभाळावी असा टोला आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी मारला. आज ते सेना-भाजप व रिपाइंच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच गिरीश महाजन यांचा उमेदवार पळविण्यात हातखंडा असल्याचे वक्तव्य केले होते. याला ना. गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीला कंटाळून लोक आमच्याकडे येत आहेत. यामुळे त्यांनी त्यांची माणसे, मुले आणि नातवंडे सांभाळावी. राष्ट्रवादीत घराणेशाहीला लोक कंटाळले असल्याचे सांगत त्यांनी जोरदार टीका केली.
पहा- ना. गिरीश महाजन नेमके काय म्हणाले ते !