गंगेश्वर महादेव मंदीरात संगीतमय श्रीराम कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह

 

यावल, प्रतिनिधी । येथे गंगानगर फालक नगर येथील गंगेश्वर महादेव मंदीरात संगीतमय श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाले असून या सप्ताहाला परिसरातील भावीकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

यावल येथील गंगा नगर मित्रमंडळाच्या वतीने शनिवार दि. २३ जानेवारीपासुन गंगेश्वर महादेव मंदीरात संगीतमय श्रीराम कथा व अखंड हरिनाम सकिर्तन सप्ताह प्रारंभ झाला आहे. या , सप्ताहाचे दैनदिन कार्यक्रमात काकड आरती पहाटे ६ते ७, कथा वाचन सकाळी ११ते २व दुपारी ३ते ५ , विष्णु स्वसहनाम सकाळी ६.३०ते ७.३० तसेच हरी पाठ सायंकाळी ५ ते ७ आणि श्री हरी किर्तन दररोज रात्री ८ते १० वाजेपर्यंत राहणार आहे. या अखंड हरिनाम सकिर्तन सप्ताहाची सुरूवात ह.भ.प. शाम महाराज ईदगावकर ( बालकिर्तनकार ) यांच्या किर्तनाने झाली. दि. २४ जानेवारीस ह. भ.प. सौ. शारदाताई, जाभुळधाबा, मलकापुर , दि. २५ जानेवारी , सोमवार रोजी ह.भ.प. भरत महाराज म्हैसवाडी, दि. २६ जानेवारी मंगळवार ह. भ.प. संजय महाराज (जमादारसर )कासोदा, दि. २७ जानेवारी बुधवार रोजी ह.भ.प. नारायण महाराज, निंभोरा, दि. २८ जानेवारी, ह.भ.प. सौ . प्रतिभाताई पाटील सोनगीर, दि. २९ जानेवरी , शुक्रवार रोजी ह.भ.प. मुकुंद महाराज चौधरी, पहुरकर, दि. ३० जानेवारी , रोजी ह. भ.प. सुर्यभान महाराज, शेळगाव ( काल्याचे किर्तन ) या किर्तनाने अखंड हरिनाम सकिर्तन सप्ताहाची सांगता होईल.

Protected Content