आणि सुनेने केला सासूचा पराभव

 

एरंडोल, प्रतिनिधी ।तालुक्यातील खडके खुर्द येथे सुनेने आपल्या चुलत सासूस पराभूत तसेच पत्नी विजयी तर  पती पराभूत झाल्याने गावात एकच चर्चा रंगली आहे.

सायली राजेंद्र पाटील (२०४) या सूनबाईंनी त्यांच्या चुलत सासू तथा माजी सरपंच सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांना पराभूत केले. युवा सेना तालुकाप्रमुख घनश्याम पाटील यांचा निवडणुकीत पराभव तर त्यांच्या धर्मपत्नी वैशाली घनश्याम पाटील (१३२) या विजयी झाल्या.
खडके खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये १४९ नोटा आहे. तसेच शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील यांच्या पॅनेलला ६ जागा मिळाल्या आहेत. तर युवा सेना तालुकाप्रमुख घनश्याम पाटील यांच्या पॅनेलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

Protected Content