Home Cities भुसावळ भुसावळात भाजपच्या पेज प्रमुखांचे संमेलन ( व्हिडीओ )

भुसावळात भाजपच्या पेज प्रमुखांचे संमेलन ( व्हिडीओ )

0
35

भुसावळ प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पक्षाच्या पेज प्रमुखांचे संमेलन उत्साहात पार पडले. यात ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, येथे पेज प्रमुखांचे संमेलन आयोजिन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यासह रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलर, नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष रमण भोळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. खासदार रक्षाताई खडसे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांच्या सहकार्याने नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी विजय संपादन करणार असल्याचा आत्मविश्‍वास प्रकट केला. तर एकनाथराव खडसे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांनी झटून कामाला लागण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मोदींच्या विश्‍वासावरच भाजपचे इनकमींग सुरु आहे. राज्यात काँग्रेसमधील विखे पाटील, राष्ट्रवादीतील मोहिते पाटील आदी राजकिय वारसा असलेल्या घराण्यांचे भाजपत इनकमींग झाले. वसंतदादा पाटील यांचे नातू माजी मंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, असे ते म्हणाले. याप्रसंगी भाजपचे पेजप्रमुख तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहा : पेज प्रमुखांच्या संमेलनातील खासदार रक्षाताई खडसे यांचे मनोगत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound