मुंबई : वृत्तसंस्था । सरकारने आता सोन्या-चांदीच्या खरेदीबाबतच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता एका निश्चित रकमेपर्यंत दागिने खरेदी केल्यास त्यावरील केवायसीची अनिवार्यता सरकारने रद्द केली आहे फक्त २ लाखांपेक्षा जास्त रकमेच्या सोने खरेदीसाठी केवायसी सक्तीचे आहे
सोन्याच्या दागिण्यांच्या खरेदीचं मूल्य जास्त असेल, फक्त त्याच ग्राहकांना पॅन किंवा आधार कार्डसोबत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने हे स्पष्टीकरण दिलं आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीचे दागिने, सोना-चांदी किंवा रत्न आणि मौल्यवान दगड खरेदी करण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचं असेल. हे नियम गेल्या काही वर्षांपासून लागू करण्यात आले आहे. १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या मूल्याचे रत्न किंवा दागिने खरेदी करताना ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
सोने-चांदी किंवा इतर मुल्यवान दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकवेळी त्यांची ओळख सांगणे म्हणजेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचं नाही.
बँकेत आणि आर्थिक संस्थांमध्ये केवायसी अत्यंत महत्त्वाची असते. कारण, या प्रक्रियेमुळे ग्राहकाची ओळख सुनिश्चित होते. त्यानंतर फसवणूक होण्याचा धोका कमी होतो.