राष्ट्रपती असतानाच ट्रम्प फरार होण्याची शक्यता ?

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेच्या संसद परिसरात मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणला. ट्रम्प यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाची सूत्रे नवे राष्ट्रपती जो बायडेन यांच्याकडे सोपवण्यापूर्वीच ट्रम्प फरार होण्याची शक्यता आहे.

२० जानेवारी रोजी जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणआर आहे. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे १९ जानेवारी रोजीच ट्रम्प हे अमेरिका सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प स्कॉटलंडला जाणार आहेत. त्यासाठी त्यांचं विमानही तयार आहे. त्यामुळे पदावर राहतानाच ट्रम्प देश सोडून जाऊ शकतात, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळेच आपल्या नावापुढे माजी राष्ट्रपती हा शब्दच नको म्हणून त्यांनी अमेरिकेतून फरार होण्याचा प्लान केल्याचंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना तुरुंगात टाकलं जाण्याचीही शक्यता आहे. ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात यावा असं २०० हून अधिक खासदारांना वाटत आहे. तात्काळ हा महाभियोग चालवून ट्रम्प यांना २० जानेवारीपदीच पदावरून हटवण्यात यावं असंही या खासदारांना वाटत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या पुढच्या काळात सद्दाम हुसैन किंवा गद्दाफी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रम्प यांनी चिथावणीखोर भाषणं देऊन त्यांच्या समर्थकांना भडकावलं. त्यामुळे २० जानेवारी रोजी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देताच हिंसा भडकवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्याची मागणीही होत आहे. या शिवाय ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे खासदारही गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याच पक्षात दोन गट पडले आहेत.

ट्रम्प यांच्या चिथावणीखोर भाषणानंतरच हिंसा भडकल्याचे अमेरिकेच्या तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे आहेत. या हिंसेला ट्रम्पच जबाबदार आहेत. त्यांनी गुन्हा केलाय. त्यांच्याविरोधात खटला भरला पाहिजे, असं कॉर्नेल लॉ इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डेव्हिड ओहिन यांनी सांगितलं.

Protected Content