Home राजकीय औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे – आठवले

औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे – आठवले

0
32

मुंबई- औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असून आमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही.त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये.असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले  आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव संमत केल्याची माहिती पुढे आल्या नंतर ना. रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाचा छत्रपती संभाजी महराजांच्या नावाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे.  मात्र औरंगाबाद मध्ये जागतिक स्तरावर नावलौकिक असणाऱ्या बौद्ध संस्कृती अजंठा आणि एलोरा या  प्राचीन लेणी आहेत.जगभरातून अजंठा एलोरा लेणी  पाहण्यासाठी  पर्यटक औरंगाबादला येतात. 

आठ जागतिक आश्चर्यांपैकी एक असणारे अजंठा एलोरा लेणी चे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. शांतता अहिंसा प्रज्ञा शील करुणा सत्य या  बौद्ध संस्कृती च्या तत्वांचे  प्रतीक अजंठा एलोरा हे जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या बौद्ध लेणींचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे अशी मागणी आज ना रामदास आठवले यांनी केली आहे.

 

 


Protected Content

Play sound