प्रताप विद्या मंदिराच्या 103 व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ

चोपडा प्रतिनिधी । चोपडा एज्युकेशन सोसायटी चोपडा संचलित प्रताप विद्या मंदिराच्या 103 व्या वर्धापन दिनाची सुरुवात दि. 7 जानेवारी 2021 रोजी संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोरेश्वर देसाई यांच्या हस्ते शालेय ध्वजारोहणाने  करण्यात आली. यावेळी प्रास्तविकात प्रशालेचे मुख्याध्यापक डी.व्ही. याज्ञिक यांनी  या वर्षी झालेल्या विविध ऑनलाईन स्पर्धा परीक्षा व शालेय कामकाजाचा आढावा घेतला. तसेच शाळेची इ. 10 वीत व इ 12 वीच्या परीक्षेतील उत्तुंग भरारी विषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाच्या सुरेल ध्वनीने मंगलमय वातावरण निर्मिती पंकज नागपुरे, कोळी सर व वैद्य सर व त्यांचा गानवृंद यांनी केली. यानंतर प्रशालेच्या सर्व ज्ञान शाखांमधून इयत्ता नववीत प्रथम आलेल्या वेदांत महेश नेवे या विद्यार्थ्यास ज्योत संचलनाचा बहुमान मिळाला.

शैक्षणिक वर्ष 2019 -20 यात इयत्ता पाचवी मधून प्रथम आलेला चि तन्मय सूर्यप्रकाश बाविस्कर तसेच इयत्ता आठवीत स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम आलेला कुणाल लक्ष्मीकांत देसले यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. इयत्ता दहावीत प्रशालेतुन प्रथम आलेला अमोल मुरलीधर पाटील,  इयत्ता बारावीत तालुक्‍यातून कला शाखेत प्रथम आलेली चंद्रकला प्रल्‍हाद भिल तर प्रशालेत इयत्ता बारावी सायन्स शाखेतून  प्रथम आलेली वैष्णवी संजीव चौधरी व शेतकी डिप्लोमा परीक्षेत  प्रथम आलेला जयेश ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक .देऊन सन्मानित केले गेले .

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई , सचिव माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी , रमेशचंद्रजी जैन , सभासद प्रफुल्लभाई गुजराथी  विविध ज्ञानशाखांचे पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक डी व्ही याज्ञिक ,  उपमुख्याध्यापक आर आर शिंदे, पर्यवेक्षक जी वाय वाणी, आर बी पाटील, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, संस्था समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी,  शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन पी पी शिंदे तसेच गुणगौरव सोहळ्याचे संचालन एम एफ माळी, टी ई लोहार यांनी केले तर आभार आर आर शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन covid-19 च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत यशस्वीरीत्या करण्यात आले

Protected Content