गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी परीक्षा फेब्रुवारी – २०२० मध्ये घेण्यात आली होती. यात  इयत्ता पाचवी भाग्यश्री सुनील चौधरी, गायत्री शिवाजी ठाकूर, महेश संजय पाटील, नीलाक्षी महेश माळी, प्रथमेश संदीप तोगे, प्रवीण दादा पाटील, राधिका रवींद्र चव्हाण, साई योगेश पाटील, श्रद्धा भिकन गायकवाड, केतन भगवान पाटील, प्रणव बापूराव पाटील, वैष्णवी बालू बोरुडे यांनी यश संपादन केले आहे.

तसेच इयत्ता आठवी श्रेया बापू पाटील, सिद्धांत विशाल पाटील, शितल बालू बोरुडे, श्रावणी सतीश सोमवंशी यांनी यश संपादित केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना सकाळ सत्राच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन विलास जोशी, मानद सचिव महेश देशमुख, स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापक प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू – भगिनींनी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.

Protected Content