आ. गिरीश महाजन यांना धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

जामनेर प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना बाँबने उडवून देण्याची धमकी दिल्या प्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर येथे काल (ता.१३) रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजन यांच्या जी एम फाऊंडेशन तर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचावेळी त्यांचे स्विय सहायक दीपक तायडे यांना फोन आला. यात समोरच्या व्यक्तीने हिंदीमध्ये बोलून गिरीश महाजन यांना एक करोड रुपये देण्याचे सांग अथवा बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी दिली. त्यानंतर काही वेळाने मोबाईलवर मॅसेज केला. त्यातही हाच मजकूर होता, सायंकाळी पाच वाजता ब्लास्ट करण्याची धमकीही त्याने दिली होती. या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content