Home धर्म-समाज भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे पोलिसांचा सन्मान

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे पोलिसांचा सन्मान

0
47

 

फैजपुर, प्रतिनिधी। समाजात कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सदैव तत्पर असण्याऱ्या पोलीस दलाचे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

पोलीस वर्धापन दिनाचे अवचित्त साधुन भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुक्याच्या वतीने, रविवार ३ जानेवारी रोजी फैजपुर पोलिस स्टेशनचे सह. पोलिस निरीक्षक. प्रकाश वानखेड़े यांचा सम्मान करण्यात आला व सर्व पोलिस कर्मचारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीसांप्रती समाजात आपुलकीचा भाव निर्माण व्हावा व जनतेच्या मनातील भीती नाहीशी होऊन,पोलीस जनतेचे मित्र आहे आणि त्यांना सहाय करणे आपल कर्तव्य आहे, या उदेश्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्राजक्ता राणे, सचिव विनोद कोल्हे, आशिष बोरोले, समन्वयक साक्षी पाटील, पूर्वा भंगाळे, हर्षवर्धन तायडे आदी उपस्थित होते
.


Protected Content

Play sound