पाचोऱ्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला शिक्षण दिन साजरा

 

पाचोरा, प्रतिनिधी । पिपल्स बँक पाचोरा येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज जन्म उत्सव समिती, पाचोरा व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव, तसेच कलावंत शाहिर परीषद महाराष्ट्र राज्य जळगाव व माळी समाज पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जंयती निमित्ताने प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात आले.

राज्य शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन “महीला शिक्षण दिन” म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दल राज्य सरकारचे सामाजिक संघटनांच्या वतीने, समता परिषदेचे जिल्हा संघटक, कलावंत शाहिर परिषदेचे जळगाव जिल्हा सरचिटणिस, शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) यांनी आभार मानले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी पोवाडा सादरकरून क्रांतीचा इतिहासाला नविन उजेळा देवून समाज प्रबोधन केले. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल मराठे, उपाध्यक्ष गजानन पाटील, कोषाध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव विनायक राऊतराय, रविंद्र रामकृष्ण पाटील, राजेंद्र एस. पाटील, रविंद्र पाटील, माळी संघटनेचे जिल्हा सल्लागार मधुकर रामदास महाजन, प्रमोद महाजन, माळी पंच मंडळाचे सचिव गजानन महाजन, रविंद्र पाटील, दिपक भावराव शेवरे, फुलसिंग पाटील, सचिन पाटील, संदीप तांबे, भिकन पाटील, हर्षल सैंदाणे, संतोष पाटील (गोराडखेडा), प्रमोद बारी, प्रकाश मराठे, भैय्या महाजन, सावकार महाजन (निंभोरा), सर्वे बहुजन समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content