प्रवाशाचे प्राण वाचविणार्‍या लता बन्सोले यांचा भुसावळात होणार सत्कार

भुसावळ प्रतिनिधी । स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळांवर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविणार्‍या लता बन्सोले-बोरीकर यांचा लवकरच भुसावळात सत्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे माहेर अमळनेरचे तर सासर भुसावळचे आहे.

लता बन्सोले-बोरीकर या मूळच्या भुसावळच्या असून सध्या त्यांचे वडील हे सध्या अमळनेर येथे वास्तव्यास आहेत. तर त्यांचे सासर देखील भुसावळचेच आहे. सौ. लता निरंजन बोरीकर ह्या महाराष्ट्र सुरक्षा बल मुंबई येथे कार्यरत आहे. दि. २६ डिसेंबर २०२० रोजी त्या ग्रँटरोड स्टेशनवर ड्युटीवर होते. प्लॅटफॉर्म वर इराणी कैझाड हे प्रवासाकरीता आलेले होते. अचानक त्यांना मीरगीचा झटका आल्याने ते खाली रुळावर बेशुद्ध होऊन पडले. तेथे ड्युटीवर सेवेत उपस्थित असलेल्या सौ.लता निरंजन बोरीकर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्याला महत्व देऊन आपल्या साथीदाराच्या मदतीने लोकल ला थांबवुन त्या व्यक्तीचा जीव वाचविला. आणि काही नागरीकांच्या मदतीने इराणी कैझाड यांना प्लॅटफॉमवर आणले प्रथमोपचार करुन त्या व्यक्तीस घरी पोहचवण्यात आले.

लता निरंजन बोरीकर यांचे वडील बाळा सटवाजी बन्सोले हे सुद्धा मुळचे भुसावळ येथील रहिवासी आहे नोकरी निमित्त तेभुसावळ येथून अमळनेर येथे स्थायिक झाले आहे. तर त्यांचे सासर हे भुसावळ येथील आहे. दरम्यान, सौ लता निरंजन बोरीकर यांच्या धाडसी कार्यबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकुर, मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आयपीएस देवेन भारती आदींनी त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, लवकरच राजगोंड समाज मित्र मंडळ, सचिन पाटील व पाटील मळा मित्र परिवार भुसावळ यांच्या तर्फे लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Protected Content