अन्नदाता तुम बढे चलो ! : राहूल गांधींचा काव्यात्मक पाठींबा

 

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन तीव्र झाले असतांना आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक कविता ट्विट करत शेतकर्‍यांना पाठींबा दर्शविला आहे.

राहुल गांधी यांनी कविता ट्विट केली आहे.

वीर तुम बढ़े चलो
धीर तुम बढ़े चलो
वॉटर गन की बौछार हो
या गीदड़ भभकी हज़ार हो
तुम निडर डरो नहीं
तुम निडर डटो वहीं
वीर तुम बढ़े चलो
अन्नदाता तुम बढ़े चलो!

अशी कविता त्यांनी ट्विट केली असून यासोबत आंदोलनाचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमधून शेतकरी आंदोलकांसमोर आव्हानं दाखविण्याचा राहुल यांनी प्रयत्न केला आहे. शेतकरी आंदोलकांवर होणारे पाण्याच्या फवार्‍याचे मारे, शेतकर्‍यांना झालेल्या जखमा, वृद्ध महिला शेतकर्‍यांचा बोचर्‍या थंडीत ठिय्या आणि आंदोलनासाठी झालेली गर्दी असे काही फोटो राहुल …यांनी कवितेसोबत ट्विट केले आहेत.

या कवितेतून शेतकर्‍यांना वीराची उपमा देत राहुल यांनी वीर तुम बढे चलो शिर्षकाखाली चार ओळी लिहील्या आहेत. केंद्र सरकारच्या जाचाला शेतकर्‍यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये, तुम्ही देशाचे अन्नदाता आहात, असं म्हणत राहुल यांनी शेतकरी आंदोलकांना आत्मविश्‍वास देण्याचा प्रयत्न केला आहे.

Protected Content