पाचोरा तालुक्यातील १७ गावात अटीतटीची लढत

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यात १२ बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीसह २१७ सदस्य बिनविरोध झाले असुन ६२७ सदस्यांसाठी १ हजार ४०४ उमेदवार निवडून रिंगणात आहेत. तालुक्यातील १७ गावात एकास एक उमेदवार समोरासमोर उभे राहिल्याने अटीतटीची लढत होणार आहे.

नगरदेवळा व पिंपळगाव (हरे.) सह बांबरुड राणीचे या तीन गावांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याने आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांना आपल्या जिल्हा परिषदेच्या गटातील मोठ्या गावांमध्ये आपल्या ‌पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

तालुक्यातील १७ गावांमध्ये एकास एक उमेदवार असल्याने याठिकाणी अटीतटीची लढत होणार आहे.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” प्र. पा. येथे ७ जागांसाठी १४, भोरटेक ७ जागांसाठी १४, डांभुर्णी ७ जागांसाठी १४, घुसर्डी ७ जागांसाठी १४, गोराडखेडा खु” ७ जागांसाठी १४, खडकदेवळा खु” ९ जागांसाठी १८, कुऱ्हाड बु” ९ जागांसाठी १८, कुऱ्हाड खु” १३ जागांसाठी २६, माहेजी ९ जागांसाठी १८, नाईकनगर ७ जागांसाठी १४, ओझर ७ जागांसाठी १४, सावखेडा खु” ७ जागांसाठी १४, शेवाळे ९ जागांसाठी १८, टाकळी बु” ७ जागांसाठी १४, तारखेडा बु” ९ जागांसाठी १८, वडगांव खु” प्र. पा. ७ जागांसाठी १४ या गावांमध्ये मोठी चुरशीची निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील दिघी, चिंचपुरे, राजुरी, रामेश्वर, सांगवी प्र. लो., सारोळा बु”, सारोळा खु”, वरसाडे प्र. बो., शहापुरा, वडगांव मुलाने, वेरुळी बु”, वेरुळी खु” ही गावे माघारीच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध झालीआहेत. तालुक्यातील अंतुर्ली बु” प्र. पा. (४), अंतुर्ली खु” प्र. लो. (८), आसनखेडा (३), अटलगव्हान (१), बाळद (२), बांबरुड प्र. पा. (२), भातखंडे (४), बिल्दी (२), दहीगाव (१), डोकलखेडा (२), दुसखेडा (८), गोराडखेडा बु” (८), हनुमानवाडी (१), होळ (१), खडकदेवळा बु” (३), खाजोळा (१), कोल्हे (२), लासगांव (६), लासुरे (२), लोहारी (३), लोहटार (२), माहेजी (१), मोहाडी (२), मोंढाळे (३), निभोरी (२), निपाणे (५), पहाण (२), पिंपळगाव हरे. (१), पिंपळगाव खु” (१), पिंप्री बु”. प्र. भ. (६), पिंप्री बु” प्र. पा. (५), पिंप्री खु” प्र. पा. (३), साजगांव (३), सार्वे बु” प्र. भ. (१), सार्वे बु” प्र. लो. (३), सावखेडा बु” (१), शेवाळे (२), तारखेडा बु” (१), तारखेडा खु” (१), वडगांव बु” प्र. पा. (४), वडगांव कडे (४), वडगांव खु” प्र. भ. (२), वाणेगांव (२) व वाघुलखेडा (४) असे २१७ सदस्य बिनविरोध झाल्याने प्रत्येकी ३ लाख रुपये प्रमाणे ६ कोटी ५० लाख रुपये निधी आमदार किशोर पाटील व आमदार गिरीश महाजन यांच्या फंडातुन विकास कामांसाठी दिला जाणार आहे.

Protected Content