पुढचे अडीच वर्षे ठाकरेच मुख्यमंत्री – ना. दिलीप वळसे पाटील

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नुकतीच अडीच वर्षे पूर्ण केले असून पुढील अडीच वर्षे देखील ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, अशी भूमिका याआधीही महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे. यात काही बदल होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन अडीच पावणेतीन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र अद्यापही तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सर्व काही ऑलबेल ठिक असल्याचे कायम सांगत आले आहेत.त्यातच आता राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, नवस फेडीन असे म्हणत मुख्यमंत्री पदाबाबत एक विधान केले आहे.

यावरुन  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, मुख्यमंत्री पदाबाबत काय चर्चा झाली ते माहित नाही. उद्धव ठाकरे हेच पुढचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील अशी भूमिका याआधीही महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे. पण सध्यातरी मुख्यमंत्री बदल करण्याची कोणतीही चर्चा महाविकास आघाडीत नाही. आणि आजच्या तारखेला काही बदल होण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे गृहमंत्री वळसे-पाटील मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Protected Content