बंद घर फोडून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिंगरेाड येथील स्टेटबँक कॉलनीतील निर्णयसागर अपार्टमेंटमधील बंद घर फोडून चेारट्यांनी ३ लाख २८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. जिल्‍हापेठ पेालिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रिंगरेाडवरील निर्णयसागर अपार्टमेंट मध्ये ज्योती प्रमोद पाटिल (वय-५२) या फ्लॅट नं.२ मध्ये कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत.तर, वरच्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये त्यांच्या सासुबाई एकट्याच राहतात. त्यांचे पती प्रमोद पाटिल जिल्‍हा न्यायालयात वकील असून मुलगा वरुण पुणे येथे नोकरीला आहे. पाटिल कुटूंबीय १८ मे पासून फ्लॅटबंद करुन पुणे येथे मुलाकडे गेले होते. तर, वरच्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये राहणारे त्यांच्या सासु येवुन जावुन लक्ष ठेवत होत्या. सोमवार ३० मे रोजी ज्योती पाटिल मुलगी मेघासह जळगावी परतल्या घरी आल्यावर त्यांना फ्लॅटचा मुख्यदार तोडलेले आढळून आले. त्यांनी शेजार्यांना आरडाओरड करुन बोलावल्यावर अशोक जोशी यांनी तत्काळ धाव घेत पेालिसांना पचारण केले. चोरट्यांनी दारचाा कडीकोयंडा तोडून आतील कपाटातील रेाकड, दागिने, बँकेचे पासबुक, आधारकार्ड पॅनकार्ड, एटिएम कार्ड असे साहित्या चेारुन नेल्याचे आढळून आले.

 

घटनेची माहिती मिळताच जिल्‍हापेठ पेालिसांनी घटनास्थळ गाठत पहाणी केली. डॉगस्कॉड, ठसे तज्ञांसह गुन्हशाखेच्या पथकाने घटनास्थळावरुन काही पुरावे संकलीत करुन पंचनामा केल्यावर ज्योती पाटिल यांच्या तक्रारीवरुन जिल्‍हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  चोरट्यांनी पाटिल यांच्या बेडरुम मधील कपाटातून  १ लाख ९४ हजार रेाख, ३ हजार रुपये किंमतीचे देान चांदिचे ग्लास, ब्रिटीश कालीन चांदिचे नाणे, ३ हजारांच्या पायातील चांदीच्या साखळ्या, १ ग्रॅम सेान्याचा शिक्का, १५ ग्रॅम वजनाचे ५ चांदिचे शिक्के, बँक ऑफ महाराष्ट्राचे पासबुक, बँकऑफ इंडियाचे एटिएम, पॅन कार्ड आधारकार्ड, निर्णयसागर अपार्टमेंट मध्येच फ्लॅट न.४ व ५ मधील रहिवासी छाया प्रकाश महाजन यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ३० हजार रुपयांचे सेान्याची चैन, २३ हजार रुपये किंमतीचे सेान्याचे मणी, ३३ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे जोड, ४९ हजाराची नाकातील नथ, ५ हजार ६०० रुपयांचे हातातील वाळे,चांदचीया तोरड्या, १ तोळा सेान्याचे पेंडल, १ लाख ८ हजार रुपयाचा पाच भार वजनाचा चांदीचा कंबरपट्टा, लाकडी कपाटातून १ लाख २५ हजार  रेाख असे ३ लाख २८ हजार ४०० रुपयांचा एकुण ऐवज चोरीला गेला आहे.याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content