झाडाच्या फांद्या तोडण्यावरून वाद; भुसावळात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी । घरासमोर असणार्‍या उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरून झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निखील नामदेव रोझोदकर (वय २८; रा. मुक्तानंद कॉलनी, आनंद नगर भुसावळ) हा काल दुपारी आपल्या घरासमोर असणार्‍या उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडत असतांना विलास निंबाळकर, जयदीप विलास निंबाळकर, निखील संतोष झांबरे, ललीत उर्फ लल्ला पाटील, मुकेश कुमावत (राजस्थानी) आणि प्रतिक देशमुख यांनी त्यांच्यासोबत वाद घातला. याप्रसंगी संबंधीतांना त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले. यावरून निखील रोझोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधीतांच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात भाग ५ गु नं./२०२० भादवि कलम-४५२,२९४,१४३, १४७,१४९,३२३,५०६ सह अनुसुचित जाती
आणि अनुसुचित जमाती कायदा १९८९ चे कलम-३(१) (दहा),३(१) (अकरा) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content