Home Cities मुक्ताईनगर डोलारखेडा परिसरात वाघाचा वावर

डोलारखेडा परिसरात वाघाचा वावर

0
30

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील डोलारखेडा शिवारात वाघाचा वावर असल्याचे आढळून आल्यामुळे परिसरातील जनतेत घबराट पसरली आहे.

डोलारखेडा तसेच परिसरात आधी देखील वाघ, बिबट्या आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर आढळून आलेला आहे. या पार्श्‍वभूमिवर वन कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गुरांच्या हौदाजवळ वाघाने, आठवडाभरात पाणी पिण्यासाठी तब्बल दोन वेळेस हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी मध्यरात्री तसेच पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाघ या ठिकाणी आल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. या पाठोपाठ आता वाघ थेट गावात दिसून आल्याने डोलारखेडा तसेच परिसरातील गावातल्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.


Protected Content

Play sound