Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या गावची संपूर्ण यादी!

मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या गावची संपूर्ण यादी!

0
6


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठीचे आरक्षण सोमवारी तहसील कार्यालयात अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. तहसीलदार गिरीश वखारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या विशेष सभेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC/SEBC) आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीच्या ८ जुलै २०२५ च्या सभेनुसार निश्चित करण्यात आल्याप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ११ ग्रामपंचायती राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रवर्गांमधील १९ ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतींमधून नियमानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (OBC/SEBC) ११ ग्रामपंचायती थेट आणि चिठ्ठीद्वारे सोडत काढून निश्चित करण्यात आल्या. यामध्ये अज्ञान बालक अर्णव विजय माळी (वय १० वर्षे) याच्या हस्ते पारदर्शक पद्धतीने चिठ्ठ्या काढून ४ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली.
या आरक्षण प्रक्रियेनंतर उर्वरित उरलेल्या ३१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण (General) प्रवर्गासाठी खुले राहील असे घोषित करण्यात आले. दुपारी १२:०० वाजता ही संपूर्ण आरक्षण प्रक्रिया शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडली.
अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित ८ ग्रामपंचायती:
१. बेलसवाडी
२. राजुरे
३. शेमळदे
४. हिवरे
५. इच्छापुर
६. हरताळे
७. खामखेडे
८. चिंचोल
अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित ११ ग्रामपंचायती:
१. चांगदेव
२. अंतुर्ली
३. धामणगाव
४. रुईखेडा
५. पारंबी
६. निमखेडी खु.
७. कुऱ्हा
८. टाकळी
९. भोटा
१०. मेहुण
११. हलखेडा
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC/SEBC) करिता आरक्षित ११ ग्रामपंचायती:
१. दुई (थेट)
२. काकोडा (थेट)
३. तरोटा (थेट)
४. सुकळी (थेट)
५. चिखली (थेट)
६. बोरखेडा (थेट)
७. को-हाळा (थेट)
८. सारोळा (सोडतद्वारे)
९. पंचाणे (सोडतद्वारे)
१०. चारठाणे (सोडतद्वारे)
११. मानेगाव (सोडतद्वारे)
सर्वसाधारण (General) प्रवर्गासाठी निश्चित ३१ ग्रामपंचायती:
१. घोडसगाव
२. चिंचखेडा खु.
३. पिंप्राळा
४. महाळखेडा
५. मोंढळदे
६. नरवेल
७. मेळसांगवे
८. पिंप्रीनांदू
९. चिंचखेडे बु.
१०. सातोड
११. सालबर्डी
१२. लोहारखेडे
१३. पुरनाड
१४. बोदवड
१५. पिंप्रीपंचम
१६. उचंदा
१७. नायगाव
१८. धामणदे
१९. निमखेडी बु.
२०. थेरोळा
२१. सुळे
२२. जोधनखेडा
२३. पिंप्रीअकारात
२४. वडोदा
२५. कुर्‍ही
२६. कोथळी
२७. नांंदवेल
२८. पातोंडी
२९. माळेगाव
३०. वायला
३१. वढवे
मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या २०२५ ते २०३० कालावधीसाठीच्या सरपंचपद आरक्षणाची प्रक्रिया तहसीलदार गिरीश वखारे यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शकपणे पूर्ण झाली आहे.

Protected Content

Play sound