जळगाव प्रतिनिधी । शहरातील यश लॉनच्या बाजूला उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लांबविल्याची घटना २० डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवार, २२ डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटेनगर येथे चेतन शामकांत चव्हाण वय ३४ हे आई , वडील, मोठा भाऊ, वहिनी, पुतणे, पत्नी, व मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते मोबाईल फोन दुरूस्तीचे काम करत असून त्यांचे गोलाणी मार्केटमध्ये जीवधानी मोबाईल नावाच दुकान आहे. २० रात्री साडेआठ वाजता काम आटोपून चेतन हे मोठ्या भावासोबत त्यांच्या दुचाकीवरुन (एम.एच. १९ एक्यू ११४४) निघाले. यादरम्यान चेतन चव्हाण हे दुरूस्तीसाठी आलेला ग्राहकाचा मोबाईल परत करण्यासाठी यश लॉन परिसरात येथे गेले. याठिकाणी यश लॉनच्या बाजूला त्यांनी दुचाकी उभी केली. पंधरा मिनिटांनी मोबाईल परत करुन आले असता, यश लॉनच्या बाजूला त्यांची दुचाकी आढळून आली नाही. इतरत्र शोध घेतला असता, दुचाकी मिळून आली नाही. दुचाकी चोरीची खात्री झाल्यावर मंगळवारी चेतन चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात २० हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.