ग्रामपंचायत निवडणूक : आठ निवडणूक निरीक्षकांसह समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ११५२ ग्रामपंचायतींपैकी ७८३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक व समन्वय अधिकाऱ्याची नियुक्तीची घोषणा केली आहे.

जिल्हयातील एप्रिल ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपुष्टात आलेल्या ७८३ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांसाठी आज बुधवार दि. २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जळगाव जिल्हयासाठी निवडणूक समन्वयक म्हणून पुरवठा उपायुक्त स्वाती देशमुख पाटील यांच्याकड जबाबदारी देण्यात आलेली आहे.  तर धुळे येथील अतिरिक्त सीईओ एस.जी माळोदे, उपजिंल्हाधिकारी धुळे सुरेखा चव्हाण यांची जळगाव जामनेर या तालुक्यांसाठी, धरणगाव एरंडोल आणि पारोळयासाठी धुळे उपजिल्हाधिकारी गोविदा दाणेज, रावेर यावल तालुक्यासाठी शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, चाळीसगाव साठी भिमराज दराडे, अमळनेर चोपडा येथे ए.जी.तडवी, पाचोरा भडगाव साठी उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा तर बोदवड साठी एस.सी बागूल असे आठ अधिकारी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.  

निुयक्त करण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीशी संबंधित सर्व कायदेशीर तरतुदी, नियम तसेच राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेले सर्व स्थायी आदेश आणि सूचनांचे पालन होत किंवा नाही याबाबतची जबाबदारी या अधिकार्‍यांवर देण्यात आलेली आहे. आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनादेखील करण्यात आल्या असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

Protected Content