विद्यापीठाचे डॉ. जी.ए.उस्माणी यांची निवड

जळगाव प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रासायनिक तंत्रज्ञान संस्थेच्या तेल व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. जी.ए.उस्माणी यांची भारत सरकारच्या भारतीय मानक ब्युरो ने सोप्स ॲड अदर सरफेस ॲक्टिव्ह एजंटस्: सीएचडी-२५ समितीवर नियुक्ती केली आहे.

संपुर्ण भारतभरातील साबण आणि इतर पृष्ठभागावरील सक्रीय एजंटसची गुणवत्ता आणि मानके नियमित करण्याची व त्यांची स्थापना करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी या समितीची आहे. डॉ.उस्माणी यांच्या या नियुक्तीबद्दल कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, प्रा. जे.बी.नाईक आदींनी अभिनंदन केले आहे.

Protected Content