संत गाडगेबाबा स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी डेबूजी वोरीयर्स संघाकडे

 जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील गाडगेबाबा क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित श्री संत गाडगेबाबा प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी डेबूजी वोरीयर्स संघाने कायम राखले. उपविजेत्या धोबीपछाड संघाचा त्यांनी २४ धावांनी पराभव करून चषकावर नाव कोरले.

 

स्पर्धेत सकाळी उपांत्य फेरी सामन्यांमध्ये रंगत पाहायला मिळाली.  धोबीपछाड संघाने १५० धावांचा वर्षाव केल्यानंतर धोबी चॅम्पियन्स संघाला ९३ धावातच रोखण्यात यश मिळवले. धोबीपछाड संघाचे गोलंदाज वीरेंद्र केणे याने तीन धावातच दोन गडी घेतले तर नितीन सोनवणे याने चार धावा दोन गडी टिपले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डेबूजी वॉरियर्स संघाने १३९ धावांचे लक्ष गाडगे बॉईज मेहरूण संघापुढे ठेवले. डेबूजी वॉरियर्स संघाचे कर्णधार अविनाश देवरे यांनी सहा धावा २ गडी तर गोपी खर्चाणे याने १७ धावा देत दोन गडी बात केले. हर्षल वाघ यांनी देखील १२ धावा २ गडी बाद करीत विजयात मोलाची भूमिका बजावली. अंतिम सामना धोबीपछाड आणि डेबुजी वारियर संघात झाला.

 

तिसऱ्या क्रमांकाच्या विजेतेपदासाठी धोबी चॅम्पियन्स आणि गाडगे बॉईज मेहरुण संघामध्ये सामना झाला.  या सामन्यांमध्ये  गाडगे बॉईज मेहरुण या संघाने विजय मिळवला. अंतिम सामन्यात धोबीपछाड संघाने डेबूजी वॉरियर्स संघाला ९१ धावांतच रोखण्यातच यश मिळविले. मात्र, उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या बळावर डेबूजी वॉरियर्स संघाने मात्र ६७ धावांतच धोबीपछाड संघाचा डाव संपवित सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद राखण्यात यश मिळविले.

 

रात्री पारितोषिक वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, माजी नगरसेवक अरुण शिरसाळे, स्पर्धा आयोजन समिती प्रमुख चेतन शिरसाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संदीप सोनवणे, गणेश सोनवणे, भूषण सोनवणे, पंकज शिरसाळे, दीपक बाविस्कर, राजेश जाधव, जयेश सोनवणे, प्रवीण आढाव, संतोष बेडिस्कर, अविनाश देवरे प्रमुख पाहुणे मंचावर प्रमुख अतिथी होते. यावेळी विजेत्या संघास अरुण शिरसाळे यांचेकडून तर व उपविजेत्या संघाला चेतन शिरसाळे यांच्यातर्फे विजयी चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संदीप सोनवणे यांच्याकडून देण्यात आले.

Protected Content