राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवार २८ डिसेंबर रोजी प्रचंड जल्लोषात झाला. दरम्यान विद्यार्थिंनींमधून अनुषा कलहोत्री (मुंबई विद्यापीठ), तेजल पाटील (कबचौ उमवि) या उत्कृष्ट स्वयंसेवक ठरल्या तर विद्यार्थ्यांमधून हेमंत पाटके (लोणेरे विद्यापीठ) व अनुप बॅनर्जी (नागपूर विद्यापीठ) हे उत्कृष्ट स्वयंसेवक ठरले.

राजभवन कार्यालयाकडून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर १९ ते २८ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा बुधवारी मोठ्या उत्साहात समारोप झाला. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी रा.से.यो.चे प्रादेशिक संचालक डी. कार्तिकेयन, रा.से.यो. राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वानंजे, एन.डी.आर.एफ.चे इन्स्पेक्टर पी.एस. राणा, अनंता बाभूळकर, रा.से.यो. सदिच्छा दूत प्रिया पाटील, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सहायक पोलिस अघिक्षक ऋषीकेश रावले, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे, समन्वयक प्रा. किशोर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, जिल्हा समन्वयक मनिष करंजे, विजय पाटील यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना श्री. संतोष कुमार म्हणाले की, या आव्हान शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक संघातील उत्तम कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिंनींची निवड करून त्यांना आव्हान शिबीराचा दुसरा टप्पा म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासक्रम एन.डी.आर.एफ.च्या सहकार्याने तयार केला जाणार असून सन २०२३ पासून या दुसऱ्या टप्प्यातील शिबीर होईल. त्यानंतर तिसरा टप्पा देखील होणार असल्याची माहिती संतोष कुमार यांनी दिली. जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती व्हावी म्हणून लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यंक्रम होणार आहेत. आप्ततीच्या वेळी प्रत्यक्ष लोकांना केलेली मदत हे मोठे पारितोतिषक असते असे सांगून हे प्रशिक्षण म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे पहिले पाऊल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी म्हणाले की, अशी शिबीरे व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्वाची ठरतात. एन.डी.आर.एफ. जवानाप्रमाणे संकटात मदत करणारी तरूण पिढी अशी शिबिरार्थींची ओळख निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून गावाकडे परतल्यानंतर सहकारी मित्रांना प्रशिक्षण त्यातून मोठी साखळी तयार होईल असे ते म्हणाले. निरीक्षक प्राचार्य संजय चाकणे यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सेवा हा भाव रा.से.यो. मध्ये जपला जातो असे सांगितले. डॉ. प्रशांतकुमार वानंजे यांनी या शिबराचे नियोजन अत्यंत उत्तम झाल्याचे सांगितले. अनंता बाभूळकर यांनी आपत्तीतील लोकांना शिबिरातील विद्यार्थ्यांनी मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. डी. कार्तीकेयन यांनी आपत्तीमध्ये लोकांना सहकार्य करण्यासाठी ही तरूण पिढी निश्चित काम करेल. रा.से.यो. चा तो स्थायी भाव आहे असे सांगितले.

प्रारंभी रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी दहा दिवसाच्या या शिबिराचा सविस्तर आढावा घेतला. रा.से.यो स्वयंसेवकांच्या वतीने अभय पाटील (नाशिक), अचल पास्ते (मुंबई), शेख अबुजल (नांदेड), संघ व्यवस्थापकांच्या वतीने आशिष भोपले (अमरावती), स्वाती गौरखेडे (नागपूर) यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सत्यजित साळवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किशोर पवार यांनी आभार मानले. यावेळी शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. पाखले, रेडक्रॉसच्या डॉ. उज्वला वर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, पोलिस निरीक्षक राहूल खताळ यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय विविध विद्यापीठांच्या रा.से.यो. संचालकांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात महाराष्ट्रातील २० विद्यापीठांमधील १०४८ जण यात सहभागी झाले होते. यामध्ये ५७० विद्यार्थी, ४१८ विद्यार्थिनी, ३९ पुरूष संघव्यवस्थापक, २१ महिला व्यवस्थापक यांचा समावेश होता. पुढील आव्हान शिबिर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात होणार असून रा.से.यो.चा ध्वज यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या संघव्यवस्थापकांकडे सुपूर्द करण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन शिबीरातील पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे.

फिरता चषक
उत्कृष्ट स्वयंसेवक (पुरूष) : हेमंत संजय पाटके (डॉ. बाबासाहेब आंबेडक तंत्र विज्ञान विद्यापीठ, लोणेरे) आणि अनुप बॅनर्जी (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर)
उत्कृष्ट स्वयंसेवक (महिला) : अनुषा सिंग कलहोत्री (एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई) आणि तेजल दीपक पाटील (धुळे जिल्हा, कबचौउमवि, जळगाव)

उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी (पुरुष) : प्रा. बालाजी पांडूरंग मोरे (नाशिक जिल्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), (महिला) : प्रा.तानिया एम. थॉमस (मुंबई उपनगर, मुंबई विद्यापीठ, मुंबई)

उत्कृष्ट जिल्हा : सातारा जिल्हा (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर),
लातूर जिल्हा (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
शोभा यात्रा : प्रथम – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती,
द्वितीय – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली,
तृतीय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Protected Content