रावेर येथे ३५ जणांवर होणार तडीपारची कारवाई

रावेर प्रतिनिधी । शहरात १९४६ वारंवार दंगली घडत असून आजपावेतो एकूण ६४ दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तथापि, लवकरच शहरातील वारंवार दंगा करणाऱ्या ३० ते ३५ जणांवर तडीपारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

काही विशिष्ठ लोक दंगलीत नेहमी भाग घेतात असे निष्पन्न झालेले असून त्यामुळे रावेर शहरात दि- २२ मार्च जनता कर्फ्यु चे दिवशी खुनासह दंगा व हाफ मर्डर सह दंगा असे५ गुन्हे असे अवघ्या -२ तासात -६ गंभीर गुन्हे दाखल झाले  असून आज पावेतो नमूद दंगलीचे गुन्ह्यात एकूण -४३६ आरोपी अटक केले असून ३९ आरोपी निष्पन्न झालेले अध्याप अटक होणे बाकी आहे. नमूद पाहिजे असलेले आरोपींना अटक करणे साठी वेगवेगळी टीम नेमण्यात आली. 

रावेर शहरातील दंगल प्रभावित भागांना अशांत क्षेत्र घोषित करण्यासाठी मा जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांचे मार्फत शासनास प्रस्थाव देखील सादर करण्यात आलेला  असून दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई वसुलीची कार्यवाही प्रस्थावीत आहे.तसेच 5 इसमावर एमपीडीाए कायद्यानुसार एक वर्षा करिता स्थानबद्द करण्यात आलेले असून नाशिक जेल मध्ये रवाना करण्यात आलेले असून,रावेर मध्ये वारंवार दंगलीत भाग घेणारे 30 ते 35 लोकांची नावे दाखल गुन्ह्यावरून निष्पन्न झालेने नमूद इसमावर तडीपार ची कारवाई प्रस्थावीत आहे.त्यामुळे दंगलकरांनो होशियार,कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल,कायद्याचे पालन करा,रावेर शहरात अबाधित शांतता ठेवा, अन्यथा पुढील आणखी सक्त कारवाईस तयार राहा असे आवाहन डीवायएसपी नरेंद्र पिंगळे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे रावेर यांनी केले आहे.

Protected Content